Translate

Sunday, 26 July 2020

What is management?. व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाचे सिध्दांत कोणते ? व्यवसायत गरज आहे एका योग्य व्यवस्थापनाची 1st.



      जगात प्रत्येक देशात प्रत्येक राज्यात विविध प्रकारचे व्यवसायिक आहेत. कोण हॉटेल चालवतय तर कोणी चहाची टपरी चालवतय. म्हणजे कोण मोठे हॉटेल काढतो तर कोण छोटी चहाची टपरी सुरू करतो अशाचप्रकारे व्यवसाय छोटा आणि मोठा असा विभागला जातो. पण कधी असे होते की छोट्या टपरीचे उद्या मोठे हॉटेल होते, तर कधी मोठे हॉटेल असूनसुद्धा ते बंद पडते. हे सगळे कशावर अवलंबून आहे तर योग्य व्यवस्थापनावर (म्हणजेच Managementवर).
     जो कोणी आता स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितो त्यांना व्यवस्थापन (मॅनेजमेंट) या विषयाचे महत्व समजले पाहिजेच, आणि मगच तो त्याच्या व्यवसायात वाढ करू शकेल.

व्यवस्थापन (मॅनेजमेंट) म्हणजे काय?   

         मॅनेजमेंट म्हणजे काय आपल्या सहकऱ्यांकडून, टीमकडून काम करून घेण्याची कला. ही कला तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्यवसायात यशस्वी होणार हे नक्की. 


        प्रत्येक व्यवसायात एक समुह असतो किंवा काही कामगार असतात त्या सर्वांचे कामाचे योग्य नियोजन करणे, त्यांच्याकडून वेळेत आणि अचूक काम करून घेणे, आपल्या व्यवसायात प्रत्येक सहकाऱ्याला दूरदृष्टी देत व्यवसायाबरोबर त्याच्या कार्यातसुद्धा प्रगती होईल अशी कार्यप्रणाली तयार करणे महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींचा क्रम आपण व्यवस्थापनाच्या सिद्धांतांमधून समजून घेतला पाहिजे.

व्यवस्थापनाचे (मॅनेजमेंटचे) सिद्धांत कोणते?

1. कामाचे वाटप करणे.
2. अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल साधून,       कामाची जबाबदारी प्रत्येकास समजावून सोपवून देणे.
3. प्रत्येक कामात शिस्त ठेवणे.
4. प्रत्येक दिलेल्या आदेशाची एकवाक्यता हवी, जेणेकरून एकच अधिकारी ती जबाबदारी पूर्ण करेल आणि कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही.
5. प्रत्येकाकडे ठराविक एकच दिशा असावी, " संस्था (company) अगोदर आपण नंतर " ही भावना लीडर आणि त्याच्या समूहात असल्यास व्यवसायात वाढ निश्चित.
6.  आपल्या व्यवसायात काम करत असलेल्या गटांमध्ये (टीममध्ये) एक हाती अधिकार/केंद्रीकरण असणे गरजेचे त्यामुळे निर्णय घ्यायची संधी मिळेल, निर्णय घेतल्या नंतर आदेशाची साखळी सांभाळत प्रत्येकाकडून अचूक काम करून घेणे.


7. गटातील प्रत्येक कनिष्ठाला (जुनीअरला) नवीन कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहन देणे, पुढाकार घेऊन नवीन कल्पनेचा स्वीकार करत व्यवसायात प्रगती आणणे.
8. शेवटचा मुद्दा समानता हवी, प्रत्येकासाठी एकच नियम असावा वरिष्ठांस वेगळा आणि कनिष्ठांना वेगळा असे नको, एकोप्याची भावना निर्माण झाली पाहिजे आणि कधी कोणाहीकडून चूक झाल्यास त्याच्याकडून ती चूक परत होणार नाही असे प्रशिक्षण देत, प्रेरणा देत राहणे.

लक्ष्यात घ्या, जर वरील सर्व सिद्धांत आपण अंमलात आणू तर मग आपल्या व्यवसायात वाढ होईल यात काही शंका नाही.

3 comments:

RohanTa said...

Best one brother

Pravin kadam. said...

Very essential knowledge for the biginers and also for those who want to be an master in management.♥️♥️♥️👌🏼👌🏼👌🏼

Unknown said...

👌